Tuesday 26 July 2016

        our life is not difficult , if we improve our life according to situation . the people who always humbled and the people who always angry those peoples are always be in a tension  . but the peoples who behave according to situation those peoples are live life tension free ...

                                                          write by : ritik suvarna vijay panchal .

Thursday 14 July 2016


                                           शांती 


                  
                         दुःखेंशो अनुद्विग्नमनः सुखेषु विगत स्पृहः  वित 
                            रागः भय क्रोध: स्थित धिर मुनीर उच्यत्ये ।।
अर्थात दुःखात जो जास्त दुःखी होत नाही ,  सु:खात जो आनंदाने हुरळून जात नाही , राग , लोभ , भय , क्रोध , मद , मत्सर , या सहा वाईट प्रवृत्तींच्या आहारी जात नाही , नेहमी शांत राहतो तो खरा साधु असतो .  
खरा साधु म्हणजे तपस्वी का ? तर नाही साधु हा शब्द इथे मनुष्याला उच्चारून म्हटले आहे . आयुष्यात सु:खी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांत चित्त . 
तुकाराम महाराज म्हणाले होते "शांती परते नाही सुख: येर अवघेची दुःख "
आपल्या अनेक संतांनी शांतीचे महत्व सांगितले आहे . पण ते महत्व समजून घेण्यास आपण कुठे तरी कमी पडलो आहोत . आपण नेहमी आयुष्य सुंदर बनवण्या च्या प्रयत्नात असतो , असे प्रत्येकाला वाटते की इतरांनी आपल्याला मोठे मानावे आणि आणि आपणच म्हणतो की आयुष्य खूप कठीण आहे . म्हणजेच आपल्याला महानता पण हवी आहे आणि आरामदायी जीवन पण , तुकाराम महाराज म्हणाले होते "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण " . गुलाबाचे फुल म्हटले की सुंदरता आणि काटे येतातच , दुःख आणि सुख: हे गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेत . मग आयुष्यात सुखी होण्याचा मार्ग कोणता ? तर तो मार्ग म्हणजे शांती .                           प्रश्न असा उरतो की शांत राहून आपल्या ला आदर आणि मान मिळेल का ?तर आदर आणि मान हे सर आइज़ैक न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आहेत " प्रत्येक क्रियेच्या नेहमी बरोबर व उलट दिशेस प्रतिक्रिया होते " . म्हणजेच जर तुम्ही इतरांशी आदर आणि मान देवून वागलात तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला आदर व मान जरूर मिळेल . 
                   अहिंसा हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे असे म्हटले जाते , पण आपण तर वेगळ्याच धर्मांमध्ये अडकले आहोत . खरेच आपल्या पूर्वजांकडून आपण काहीही आत्मसात केलेले नाही हे खरे . ज्या शांती च्या शोधात आज आपण आहोत ती मिळवण्याचा मार्ग गौतम बुद्धांनी इस.वि सन पूर्व ४५० च्या सुमारास सांगितला होता . पण आजूनही त्या मार्गांवर कोणीही चालताना दिसत नाही . 
पण अहिंसेचा संदेश अजून एक वर्षानु वर्षे चालत आलेली एक वारी देत आहे . पंढरपूची वारी आजही शांतीचा , बंधुत्वाचा संदेश देत आहे . या वारीचे विशेषण म्हणजेच येथे लहान-थोर असा भेदभाव न मानता लोक आनंदाने एकमेकांच्या पाया पडतात , येथे येणाऱ्या प्रत्येकाला पांडुरंगाचे रूप समजले जाते . माणसात देव शोधणारा हा पहिला संप्रदाय . आज या वारीचे उदाहरण घेतले पाहिजे . पण काय "ठेविले अनंते तैसेची रहावे  " हे जणू आपले घोषवाक्यच ठरले आहे . 
            जें का रंजले गांजले , त्यांसी म्हणे जो आपुले ;
            तोंचि साधू ओळखावा , देव तेथेचि जाणावा ।।
पण आपल्या पैकी किती जण रस्त्यावर कोणे धडपडून पडले असता त्याला मदत करायला जाता ? इतरांना दुःख नाही आनंद देण्यात खरा मोठेपणा आहे . माणूस पैशाने नाही कर्तृत्वाने मोठा होतो . स्वतःसाठी आनंद हा पैशाने नाही तर इतरांना आनंद देवून मिळवता येतो . माणसाला महान हिंसा नाही , अहिंसाच बनवते म्हणून शांती हा सुख: मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे . 
समाजसेवा ही फक्त पैशांचीच नसते , इतरांना आनंद वाटणे ही सर्वात मोठी समाजसेवा आहे . 
आजही आपण हिंदू मुस्लिम हा भेद मानतो आज आपण या भेदाला नष्ट करण्याचा विडा उचलुया . हो हे काम आपलेच आहे युवापिढीचे . जे पंढरपूरमध्ये होते ते आपण आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न करूया , आज भारताला पंढरपूर बनवूया ... 
                     खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी 
                     नाचती भारतीय भाई रे ।
                     थोर अभिमान केला पायठनी 
                     एकमेका लागतीया पायी रे ।।

आपल्या मनातला मी पण सोडून आज एक होऊया ..... 

मी लिहिलेला हा लेख शांतीच्या त्या महान पुरस्कर्त्यांना समर्पित ,
काही त्रुटी असतील तर त्या मात्र माझ्या .... 

त्रुटी असल्यास कळवावे ही विनंती ... 

आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें । शब्दाचींच शस्‍त्रें यत्‍ने करूं 

                                                                    धन्यवाद !!
                                           
                                               लेखक ,
                                               रितीक सुवर्णा विजय पांचाळ . 
                                                                                                                                                          
               
           

बागच 







Saturday 9 July 2016

सामान्य माणूस 

 असे म्हणतात की सामान्य माणसात एक असामान्य असे सामर्थ्य असते . त्या असामान्य सामर्थ्याची मूर्ती मंत उदाहरणे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर , गाडगे बाबा , गांधी जी , हे आपल्यातलेच काही सामान्य व्यक्ती होते . पण त्यांच्या कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने ते आज असामान्य म्हणवतात . 
आज मी  डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे मला उमजलेले विचार सांगत आहे . 
 डॉ . बाबासाहेब आंबेडकर . 
शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा ,आशा अनमोल विचारांची देणगी बाबासाहेबांनी आपणा सर्वाना दिली . पण आपल्या पैकी किती लोक त्यांना या विचारांनी ओळखतात . किती जणांना माहीत आहे की त्यानी फक्त दलितांसाठीच नाही परंतु बहुजनांसाठी अनेक सुधारणा घडवून आणल्या . 
आपल्या पैकी किती जणांनी त्याच्या विषयी जाणून घेण्याचा विचार केला , आपण समाजसुधारकाला ओळखतो ते त्याच्या आयुष्यावर सिनेमा आल्यावरच . आपल्या पैकी किती लोक मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून शहीद झालेल्या हुतात्म्यांची योग्य संख्या सांगू शकता , नाही ना कारण आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. बाबासाहेबांनी नाशिक चे काळाराम मंदीरात  फक्त दलितांसाठीच नाही तर सर्व जातींच्या लोकांना प्रवेश मिळवून दिला होता हे किती जणांना माहीत आहे . पण त्यानी कधी आपल्या असामान्यते चा पुरस्कार केला नाही . बाबासाहेब हे आपल्या सर्व तरुणांचे आहेत . बाबासाहेब म्हणाले होते मी आधी भारतीय आहे व नंतरही भारतीयच आहे . आपल्या पैकी अनेक लोक आज ही श्रेष्ठ - कनिष्ठ हा मतभेद मानतात . कनिष्ठांच्या घरात पाणी पीत नाही , हा भेद का ? प्रभू श्री रामांनी  सुद्धा शबरी च्या हातचे बोरे खाल्ली होती , श्री कृष्णाने सुदामाचे पाय धुतले होते . देवाला देव पण देवत्वाने येत, तर माणसाला माणूसपण माणुसकीने येत . माणुसकी हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे हेआपल्याला का नाही समजत ?....... 
आपल्यात फूट पडली नाही आहे , आपण ती पडली आहे . असे असेल तर देश प्रेम कसे निर्माण होईल ? तरुणाई विभागली गेली तर देशाचे भविष्य कोण ठरवेल ...? 
माझे विचार पटले असतील तर 
म्हणा ..... 
"पाडू चला रे भिंत ही मज आड येणारी ,
या मना - मना तून बांधूया एक वाट जाणारी "
 हिंदू ,मुस्लिम आज सारे एक येवूया ,
देशाच्या उन्नतीचे अन प्रगतीचे गीत गवूया .... 
आज खऱ्या बाबासाहेबांसमोर एकतेने आणि धृढ संकल्पाने नतमस्तक होवूया ......
या पुढे कोणे विचारले तू कोण आहेस ? तर अभीमानाने  सांगा , मी भारतीय आहे ... 
चला सामान्य वरून असामान्य बनण्याची वेळ आली आहे !
तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू म्हणाले होते , 
आज तो आपण आपल्यात जागा करूया ... 
,माझ्या लेखाचा विचार मनापासून करावा ही नम्र विनंती . 

                                                                                                               धन्यवाद 



लिहिताना काही चुकले असेल तर क्षमस्व . 



                                                                          लेखक ,
                                                                          रितीक पांचाळ 



Friday 8 July 2016

  वरळी कोळीवाडयातील पाऊस ....... 
आनंद दायी की समस्या ...... 

वरळी कोळीवाड्यात रहाणाऱ्या सर्व रहिवाश्याना .... 
मित्र हो निर्णय तुम्ही घ्या . आज वाढत्या शहरी करणात कदाचीत आपल्या दृष्टीस आले नसेल पण १० मिनिटे पाऊस पडला की आपल्या कोळीवाड्यात जणू काही पाण्याची नदी वाहते . पूर्ण रस्त्यावर एक लहान मुलाच्या ढोपरा एवढे पाणी साचते . गटार तुंबण्याचा विचार केला तर पाण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे . आणि बाकीच्या परिसराची तुलना केल्यास त्या परिसरात  एवढे पाणी दिसत नाही . मग या बद्दल जाब कोणी विचारावा . कोळीवाड्याच्या बाहेर गेले की साचलेले पाणी दिसत नाही याचा अर्थ काय असावा ? हा प्रश्न मला सुद्धा पडतो . मग याचा आरोप कोणावर जावा गटारे साफ करणाऱ्यांवर ,पण ते तर नेहमी गटारे साफ करतानादिसतात , मग लोकांवर कारण कचरा गाडयांची सोय केली असताना ही पाणी साचले की ते पाण्यात कचरा टाकतात , इथे जबाबदार नागरिक म्हणवतात आणि पाऊस पडला दारा समोरून पाणी वाहु लागले की त्यात कचरा अगदी अभिमानाने टाकतात . अशा नागरिकांना काय म्हणावे ,सुसंकृत की असंस्कृत . विचार करा आपण त्या नागरिकां मध्ये येतो का ? देश तेव्हाच चांगला होईल जेव्हा आपण आपले कर्तव्य करू . गांधी जी म्हणाले होते आधी स्वतः बदला आस पास चे जग आपोआप बदलेल . 

चला एक जबाबदार नागरिक म्हणून एक निर्धार करूया आजपासून  घरातील कचरा हा नेहमी B.M.C च्या कचरा गाडीतच टाकायचा . 
बदल हा  लवकर घडत नाही पण काही वर्षातच आपल्या कोळीवाड्यातही 
अजिबात पाणी साचणार नाही . 

                                                              मी एक जागरूक नागरिक 


माझे काही चुकले असेल तर क्षमस्व ....... 
                                                                 
                                                                    धन्यवाद .....