Saturday 9 July 2016

सामान्य माणूस 

 असे म्हणतात की सामान्य माणसात एक असामान्य असे सामर्थ्य असते . त्या असामान्य सामर्थ्याची मूर्ती मंत उदाहरणे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर , गाडगे बाबा , गांधी जी , हे आपल्यातलेच काही सामान्य व्यक्ती होते . पण त्यांच्या कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने ते आज असामान्य म्हणवतात . 
आज मी  डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे मला उमजलेले विचार सांगत आहे . 
 डॉ . बाबासाहेब आंबेडकर . 
शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा ,आशा अनमोल विचारांची देणगी बाबासाहेबांनी आपणा सर्वाना दिली . पण आपल्या पैकी किती लोक त्यांना या विचारांनी ओळखतात . किती जणांना माहीत आहे की त्यानी फक्त दलितांसाठीच नाही परंतु बहुजनांसाठी अनेक सुधारणा घडवून आणल्या . 
आपल्या पैकी किती जणांनी त्याच्या विषयी जाणून घेण्याचा विचार केला , आपण समाजसुधारकाला ओळखतो ते त्याच्या आयुष्यावर सिनेमा आल्यावरच . आपल्या पैकी किती लोक मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून शहीद झालेल्या हुतात्म्यांची योग्य संख्या सांगू शकता , नाही ना कारण आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. बाबासाहेबांनी नाशिक चे काळाराम मंदीरात  फक्त दलितांसाठीच नाही तर सर्व जातींच्या लोकांना प्रवेश मिळवून दिला होता हे किती जणांना माहीत आहे . पण त्यानी कधी आपल्या असामान्यते चा पुरस्कार केला नाही . बाबासाहेब हे आपल्या सर्व तरुणांचे आहेत . बाबासाहेब म्हणाले होते मी आधी भारतीय आहे व नंतरही भारतीयच आहे . आपल्या पैकी अनेक लोक आज ही श्रेष्ठ - कनिष्ठ हा मतभेद मानतात . कनिष्ठांच्या घरात पाणी पीत नाही , हा भेद का ? प्रभू श्री रामांनी  सुद्धा शबरी च्या हातचे बोरे खाल्ली होती , श्री कृष्णाने सुदामाचे पाय धुतले होते . देवाला देव पण देवत्वाने येत, तर माणसाला माणूसपण माणुसकीने येत . माणुसकी हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे हेआपल्याला का नाही समजत ?....... 
आपल्यात फूट पडली नाही आहे , आपण ती पडली आहे . असे असेल तर देश प्रेम कसे निर्माण होईल ? तरुणाई विभागली गेली तर देशाचे भविष्य कोण ठरवेल ...? 
माझे विचार पटले असतील तर 
म्हणा ..... 
"पाडू चला रे भिंत ही मज आड येणारी ,
या मना - मना तून बांधूया एक वाट जाणारी "
 हिंदू ,मुस्लिम आज सारे एक येवूया ,
देशाच्या उन्नतीचे अन प्रगतीचे गीत गवूया .... 
आज खऱ्या बाबासाहेबांसमोर एकतेने आणि धृढ संकल्पाने नतमस्तक होवूया ......
या पुढे कोणे विचारले तू कोण आहेस ? तर अभीमानाने  सांगा , मी भारतीय आहे ... 
चला सामान्य वरून असामान्य बनण्याची वेळ आली आहे !
तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू म्हणाले होते , 
आज तो आपण आपल्यात जागा करूया ... 
,माझ्या लेखाचा विचार मनापासून करावा ही नम्र विनंती . 

                                                                                                               धन्यवाद 



लिहिताना काही चुकले असेल तर क्षमस्व . 



                                                                          लेखक ,
                                                                          रितीक पांचाळ 



No comments:

Post a Comment