Thursday, 14 July 2016


                                           शांती 


                  
                         दुःखेंशो अनुद्विग्नमनः सुखेषु विगत स्पृहः  वित 
                            रागः भय क्रोध: स्थित धिर मुनीर उच्यत्ये ।।
अर्थात दुःखात जो जास्त दुःखी होत नाही ,  सु:खात जो आनंदाने हुरळून जात नाही , राग , लोभ , भय , क्रोध , मद , मत्सर , या सहा वाईट प्रवृत्तींच्या आहारी जात नाही , नेहमी शांत राहतो तो खरा साधु असतो .  
खरा साधु म्हणजे तपस्वी का ? तर नाही साधु हा शब्द इथे मनुष्याला उच्चारून म्हटले आहे . आयुष्यात सु:खी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांत चित्त . 
तुकाराम महाराज म्हणाले होते "शांती परते नाही सुख: येर अवघेची दुःख "
आपल्या अनेक संतांनी शांतीचे महत्व सांगितले आहे . पण ते महत्व समजून घेण्यास आपण कुठे तरी कमी पडलो आहोत . आपण नेहमी आयुष्य सुंदर बनवण्या च्या प्रयत्नात असतो , असे प्रत्येकाला वाटते की इतरांनी आपल्याला मोठे मानावे आणि आणि आपणच म्हणतो की आयुष्य खूप कठीण आहे . म्हणजेच आपल्याला महानता पण हवी आहे आणि आरामदायी जीवन पण , तुकाराम महाराज म्हणाले होते "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण " . गुलाबाचे फुल म्हटले की सुंदरता आणि काटे येतातच , दुःख आणि सुख: हे गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेत . मग आयुष्यात सुखी होण्याचा मार्ग कोणता ? तर तो मार्ग म्हणजे शांती .                           प्रश्न असा उरतो की शांत राहून आपल्या ला आदर आणि मान मिळेल का ?तर आदर आणि मान हे सर आइज़ैक न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आहेत " प्रत्येक क्रियेच्या नेहमी बरोबर व उलट दिशेस प्रतिक्रिया होते " . म्हणजेच जर तुम्ही इतरांशी आदर आणि मान देवून वागलात तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला आदर व मान जरूर मिळेल . 
                   अहिंसा हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे असे म्हटले जाते , पण आपण तर वेगळ्याच धर्मांमध्ये अडकले आहोत . खरेच आपल्या पूर्वजांकडून आपण काहीही आत्मसात केलेले नाही हे खरे . ज्या शांती च्या शोधात आज आपण आहोत ती मिळवण्याचा मार्ग गौतम बुद्धांनी इस.वि सन पूर्व ४५० च्या सुमारास सांगितला होता . पण आजूनही त्या मार्गांवर कोणीही चालताना दिसत नाही . 
पण अहिंसेचा संदेश अजून एक वर्षानु वर्षे चालत आलेली एक वारी देत आहे . पंढरपूची वारी आजही शांतीचा , बंधुत्वाचा संदेश देत आहे . या वारीचे विशेषण म्हणजेच येथे लहान-थोर असा भेदभाव न मानता लोक आनंदाने एकमेकांच्या पाया पडतात , येथे येणाऱ्या प्रत्येकाला पांडुरंगाचे रूप समजले जाते . माणसात देव शोधणारा हा पहिला संप्रदाय . आज या वारीचे उदाहरण घेतले पाहिजे . पण काय "ठेविले अनंते तैसेची रहावे  " हे जणू आपले घोषवाक्यच ठरले आहे . 
            जें का रंजले गांजले , त्यांसी म्हणे जो आपुले ;
            तोंचि साधू ओळखावा , देव तेथेचि जाणावा ।।
पण आपल्या पैकी किती जण रस्त्यावर कोणे धडपडून पडले असता त्याला मदत करायला जाता ? इतरांना दुःख नाही आनंद देण्यात खरा मोठेपणा आहे . माणूस पैशाने नाही कर्तृत्वाने मोठा होतो . स्वतःसाठी आनंद हा पैशाने नाही तर इतरांना आनंद देवून मिळवता येतो . माणसाला महान हिंसा नाही , अहिंसाच बनवते म्हणून शांती हा सुख: मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे . 
समाजसेवा ही फक्त पैशांचीच नसते , इतरांना आनंद वाटणे ही सर्वात मोठी समाजसेवा आहे . 
आजही आपण हिंदू मुस्लिम हा भेद मानतो आज आपण या भेदाला नष्ट करण्याचा विडा उचलुया . हो हे काम आपलेच आहे युवापिढीचे . जे पंढरपूरमध्ये होते ते आपण आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न करूया , आज भारताला पंढरपूर बनवूया ... 
                     खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी 
                     नाचती भारतीय भाई रे ।
                     थोर अभिमान केला पायठनी 
                     एकमेका लागतीया पायी रे ।।

आपल्या मनातला मी पण सोडून आज एक होऊया ..... 

मी लिहिलेला हा लेख शांतीच्या त्या महान पुरस्कर्त्यांना समर्पित ,
काही त्रुटी असतील तर त्या मात्र माझ्या .... 

त्रुटी असल्यास कळवावे ही विनंती ... 

आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें । शब्दाचींच शस्‍त्रें यत्‍ने करूं 

                                                                    धन्यवाद !!
                                           
                                               लेखक ,
                                               रितीक सुवर्णा विजय पांचाळ . 
                                                                                                                                                          
               
           

बागच 







No comments:

Post a Comment